गोष्टी ऐका, गुणवंत व्हा.
गोष्टी ऐका, गुणवंत व्हा.
लहान मुलांना गोष्टी फार आवडतात. या छोट्या पुस्तकातील पंचवीस बालकथा ऐकतांना त्यांना गंमत वाटेलच पण त्याच बरोबर काही ना काही संदेश देखील मिळेल, उदा. खरं बोला, मेहनतीचे फळ गोड असते, सर्वांशी प्रेम-दया या भावाने वागा, मोठ्यांचा आदर करा, जशी संगत तशी रंगत... अशा अनेक गोष्टी आपली लाडकी मुले या कथा ऐकतांना समजून घेतील. या सर्व गोष्टी, त्यातून मिळणारे संदेश जर मुलांनी आपल्या आचरणात आणल्या तर भविष्यकाळात ही मुले नक्कीच ‘माणूस’ म्हणून चांगली घडतील. शारीरिक विकासा बरोबरच मुलांच्या मनाचा व बुद्धीचा विकास होणेही गरजेचे आहे. या गोष्टी नक्कीच त्यांच्या अनेकांगी विकासाला मदत करतील. कथांमधुन मुलांना प्राप्त होईल - • सद्गुणांचा खजिना जो कुणीही लुटू शकणार नाही. •संस्कारांची मौल्यवान भेट जी सदैव त्यांना साथ देईल. • उत्तम चारित्र्याचा मजबूत पाया जो त्यांची मान नेहमी ताठ ठेवील.
माता, शिक्षक यांनी आठवड्यातून दोन कथा तरी मुलांना सांगाव्यात व त्यातून मिळणार्याय संदेशाची मुलांबरोबर चर्चा करावी. ती गोष्ट दुसर्याम वेळेस मुलांकडून ऐकावी आणि या सर्व कथांमधून त्यांना मिळणार्याह संदेशावर जास्त भर द्यावा. शाळेत शिक्षक-शिक्षिकांनी या कथांवर आधारीत नाटक बसवून घ्यावे किंवा चित्रकला स्पर्धा ठेवावी. या अशा उपक्रमांमुळे या कथांमधून मिळणारी शिकवण मुलांच्या मनावर पक्की बिंबेल.
या संदेशयुक्त कथा म्हणजे एक एक मोती आहे. आम्ही हे विखुरलेले मोती एकत्र एका माळेत गुंफण्याचा एक प्रयत्न केला आहे.
- लक्ष्मीनारायण बैजल