Navi Arthkranti नवी अर्थक्रांती


1.0.1 by NaviArthkranti
2018年11月11日 历史版本

关于Navi Arthkranti नवी अर्थक्रांती

A global spearhead of literate, prosperous & enriched Maharashtra.

नमस्कार वाचकहो,

सध्या विविध समाज माध्यमांतून ३ लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्सना अपडेट ठेवणार्‍या आणि प्रेरणा देणाऱ्या ‘नवी अर्थक्रांती’चे हे मोबाईल अॅप्लिकेशन सादर करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे.

साक्षर, संपन्न व समृध्द महाराष्ट्र घडवण्यासाठी व महाराष्ट्राची ही ओळख जगभर पोहोचवण्यासाठी नवी अर्थक्रांतीची सुरुवात दोन वर्षांपूर्वी झाली. समाजातील सर्व स्तरावर आर्थिक ज्ञान पोहोचवणे व त्यातून वेगवान विकास घडवून आणणे हे ध्येय घेऊन उद्योगविषयक माहिती, आर्थिक साक्षरता, तंत्रज्ञान, चालू घडामोडी तसेच प्रेरणादायक गोष्टींनी परिपूर्ण केवळ चांगल्या आणि उत्कृष्ट ज्ञानाचा शोध घेणे व त्याला प्रकाशित करणे, हे काम गेली दोन वर्षे फेसबुकच्या माध्यमातून करत आहोत.

दररोज सकाळी ०६.०० वाजता आकर्षक छायाचित्राबरोबर प्रकाशित होणारा प्रेरणादायी सुविचार दिवसाची सुरुवात चांगली करतो, म्हणून अनेक लोक वाट पाहत असतात. सकाळी १०.०० वाजता प्रकाशित होणारे लेख दिशादर्शक व मार्गदर्शक ठरत आहेत. त्याचबरोबर दुपारी ०२.०० वाजता यशस्वी उद्योगाच्या कथा प्रकाशित केल्या जातात. समाजातील केवळ सकारात्मक गोष्टींना प्रसिध्दी देऊन तरुणांना उर्जा देण्याची कार्यप्रणाली अखंडपणे चालत आहे. शनिवारी रात्री ८.१५ वाजता बिझनेस गप्पांचा तास असतो, तसेच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन दिले जाते. रोज रात्री १२.०० वाजता त्या त्या दिवसाचे महत्त्व सांगणारे लेख असे ज्ञानदानाचे काम चालू असते.

जगातील जे काही सर्वोत्तम असेल ते महाराष्ट्रात उपलब्ध करुन देण्याचा ध्यास घेतलेली माणसे या चळवळीशी जोडली जाऊ लागली आहेत. लाखो युवकांना प्रेरणा देणारे विचार नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून वेळोवेळी अखंडितपणे लोकांपर्यंत पोहोचत आहेत. नवी अर्थक्रांतीच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्रात अनेकांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे, वाढवला आहे. नवी अर्थक्रांतीने महाराष्ट्रातील तरुणाईला वेगवान करण्यासाठी अनेक उपक्रम सुरु केले आहेत. आजवर शेकडो लोकांना मुद्रा कर्ज तसेच इतर उद्योग कर्जे मिळवून दिली आहेत, त्याचबरोबर बिझनेस प्लॅन बनवायला शिकवणे, कंपनी रजिस्ट्रेशन करणे, उद्योग आधार नोंदणी, गुगल बिझनेस रजिस्ट्रेशन करणे, डिजीटल साक्षरता यासारख्या अनेक प्रकल्पावर नवी अर्थक्रांतीचे काम चालू आहे. गेल्या वर्षभरात सहा आयटी कंपन्या निर्माण करुन त्याच्या माध्यमातून लोकांना परवडणाऱ्या दरात वेबसाईट बनवून देणे तसेच इतर अनेक पध्दतीने बिझनेस वाढवायला मदत करणे अशी उल्लेखनीय कामे नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून केली जात आहेत. महाराष्ट्राच्या अनेक भागात ४०० हून अधिक व्याख्याने, चर्चासत्रे, मार्गदर्शनपर कार्यक्रम राबवले गेले आहेत. कितीही लहानातल्या लहान खेड्यात सुध्दा जाऊन काम करण्याचे काम नवी अर्थक्रांतीची टीम करत असते. असेच अनेक उपयुक्त कार्यक्रम, भाषांतरीत पुस्तके, आर्थिक वर्षानुसार दिनदर्शिका, स्टार्टअप महाराष्ट्र, थेट परदेशी गुंतवणूक यासारखे नवीन उपक्रम घेऊन आपल्या सेवेत उपयुक्त ठरण्याची भूमिका चालू आहे.

हे सर्व अविरत चालू राहावे यासाठी आम्हाला आपल्या सर्वांच्या प्रेमाची आणि आशिर्वादाची साथ हवी आहे. आपल्याला जगासोबत अपडेटेड ठेवण्यासाठी उपयुक्त माहिती आणि ज्ञानाचा खजिना उपलब्ध करून देण्यासाठी ‘नवी अर्थक्रांती’ सदैव तत्पर आणि कटिबद्ध आहे.

‘नवी अर्थक्रांती’ला अधिक प्रभावी आणि परिपूर्ण करण्यासाठी आपल्या प्रतिक्रियांचे कायमच स्वागत आहे. कृपया आपली प्रतिक्रिया naviarthkranti@gmail.com या मेलआयडीवर किंवा ८८९८७९४८६४ या व्हॉटस अप क्रमांकावर कळवा.

धन्यवाद,

नवी अर्थक्रांती

पुस्तके खरेदी करण्यासाठी भेट द्या - http://naviarthkranti.org/shop

संपर्क :- 07208145022 / 097670 02958

E-mail : naviarthkranti@gmail.com |

Website : http://naviarthkranti.org

最新版本1.0.1更新日志

Last updated on 2018年12月01日
दोष निराकरणे आणि कार्यप्रदर्शन सुधारणा

更多应用信息

最新版本

1.0.1

上传者

Ahmad Talafha

系统要求

Android 4.4+

举报

举报不当内容

更多

下载 APKPure App

可在安卓获取Navi Arthkranti नवी अर्थक्रांती的历史版本

下载

下载 APKPure App

可在安卓获取Navi Arthkranti नवी अर्थक्रांती的历史版本

下载

Navi Arthkranti नवी अर्थक्रांती相关应用

最新发现