Easy Marathi Letter Writing for students - मराठी पत्र लेखन
Marathi Patra Lekhan. Improve your marathi patra lekhan skills.
शालेय अभ्यासक्रमात पत्र लेखनाचा समावेश केलेला आहे. पत्र लेखन ही एक कला आहे. सततच्या सरावाने विद्यार्थी ही कला आत्मसाथ करू शकतात. आपले विचार दुसऱ्या पर्यंत पोहचविण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पत्र.
पत्र लेखनाचे साधारण दोन प्रकार पडतात १) घरगुती पत्रे (अनौपचारिक पत्रे) २) व्यावहारिक पत्रे (औपचारिक पत्रे)
आई, वडील , भाऊ , बहीण अथवा इतर आप्त, नातेवाईक मंडळी आणि मित्र यांना उद्धेशून लिहलेली पत्रे ही अनौपचारिक पत्रे होत.
व्यावहारिक कामासाठी त्रयस्थ व्यक्तींना, शासकीय कार्यालयांना, खाजगी कंपन्यांना पत्रे लिहावी लागतात ती व्यावहारिक पत्रे अथवा औपचारिक पत्रे होत.