下載 APKPure App
可在安卓獲取MVKS的歷史版本
孟買大學是工人的利益燃燒的大樓唯一的工會組織
मुंबई विद्यापीठ हे १६० वर्षा पूर्वेचे ऐतिहासिक विद्यापीठ म्हणून ओळखले जाणारे विद्यापीठ आहे.मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व अस्थायी कामगारांच्या एकीने मुंबई विद्यापीठ कामगार संघटनेची स्थापन नोव्हेंबर २०१४ साली सर्व अस्थायी कामगारांच्या एकजुटीने करण्यात आली व त्या संघटनेचे व कामगारांचे संपूर्ण अधिकार संघटनेचे अध्यक्ष मा.श्री. मिलिंद तुळसकर साहेबांच्या हाती देण्यात आले मुंबई विद्यापीठ कामगार संघटना ही विद्यापीठातील सर्व अस्थायी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी गेले ४ वर्ष लढा देत आहे प्रत्येक अस्थायी कामगार जो पर्यंतर स्थायी स्वरूपात विद्यापीठात रुजू होत नाही तो पर्यंतर मुंबई विद्यापीठ कामगार संघटना मा. श्री. मिलिंद तुळसकर साहेबांच्या नेतृत्वाखाली लढा देण्याचे काम करीत राहील कामगार हा माझा श्वास असे ब्रीद वाक्य मा.तुळसकर साहेबांचे असून त्याच प्रमाणे प्रत्येक कामगारांमधील आपला श्वास शोधून प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचे काम तुळसकर साहेब करीत आहेत तुळसकर साहेबांनी अशा अनेक कामगार संघटनाना न्याय मिळवून देऊन प्रत्येक कामगार हा आज ताठ मानेने व सन्मानाने समाजात वावरत आहे मुंबई विद्यापीठातील अस्थायी कामगारांना हेच प्रामाणिक नेतृत्व लाभल्याने तेही त्यांच्या पुढील जीवनात ताठ मानेने आणि सन्मानाने वावरणार आहेत म्हणूनच मुंबई विद्यापीठ कामगार संघटनेला कामगारांचे हित जपणारी ज्वलंत संघटना म्हणून ओळखली जाते