Use APKPure App
Get Marathi Paisa old version APK for Android
Marathi Paisa - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा !!!
गेल्या १०-१५ वर्ष्यात भारताने जी आर्थिक प्रगती केली त्यामुळे गेल्या काही वर्ष्यात सर्वात मोठा बदल आपल्या मानसिकतेत झाला आहे. पैश्याची बचत करण्याची मानसिकता कमी होऊन आता खर्च करण्याची मानसिकता तयार होत आहे.
एका बाजूला भारताची आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने होत असलेली घोडदौड तर दुसऱ्या बाजूला सामान्य वर्गात फोफावत चाललेला चंगळवाद. वाढलेली कमाई, घरात कमवणाऱ्या व्यक्तींची वाढलेली संख्या, वाढलेल्या गरजा आणि यावर सहजरित्या उपलब्ध असलेली कर्जे यामुळे सगळीकडे आर्थिक भरभराटीचे वातावरण आहे. पण खरच हे सर्व योग्य आहे का? तर नाही. कारण हातात पैसा खेळणे म्हणजे भरभराट नाही तर हातातील पैसा योग्यरीत्या हाताळून त्यातून आजच्या आणि भविष्यातील गरजांचे नियोजन करणे म्हणजे योग्य जीवन.
जगप्रसिद्ध गुंतवणूक दार आणि "रिच डॅड पूर डॅड" पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्या म्हणण्यानुसार "आर्थिक जीवन आता सोपे राहिले नाही आपल्याला आता जास्तीत जास्त स्मार्ट होण्याची गरज".
आपल्या जीवनात शिक्षणाच्या तीन पायऱ्या असतात.
पहिली पायरी: शालेय शिक्षण
दुसरी पायरी: महाविद्यालयीन शिक्षण
तिसरी पायरी: आर्थिक शिक्षण
जगभरात आज पहिल्या आणि दुसऱ्या पायरी चे शिक्षण देणाऱ्या लाखो शाळा आहेत पण आर्थिक शिक्षण देणाऱ्या शाळा उपलब्ध नाहीत. आपण २०-२५ पासून पैसा कमवायला लागतो तिथून वयाच्या ६० पर्यंत आपण पैसा कमवायला पळत असतो पण तोच कमावलेला पैसा.
हाताळायचा कसा?
गुंतवायचा कसा?
बचत कसा करायचा?
पैशाला कामाला कसे लावायचे?
हा विचार सामान्य व्यक्ती कधीच करत नाही. आज आपल्या कमाई मधून काही उत्पन्न भविष्यातील गरजासाठी योग्य गुंतवणूक करावी असे आपल्याला वाटत नाही त्यामुळे ६० नंतर ही काम% लोकांना येते म्हणूनच वेळ आली आहे अर्थ साक्षर.
गेले १४ वर्षे शेअर बाजार, मुच्यअल फंड, जीवन विमा, आर्थिक नियोजन, या क्षेत्रात १४०० ग्राहकासोबत काम करताना एक बाब लक्षात की आपला मराठी मराठी रिस्क घेण्यासाठी कधीही तयार असतो पण गुंतवणुकीच्या बाबतीत अजूनही, विमा क्षेत्रात, मासिक ठेवी, पोस्ट, सोने, यातच अडकून पडला आहे. ही मानसिकता कुठे तरी बदलणे गरजेची आहे. यासाठीच २०१३ पासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. त्याला मिळणारा प्रतिसाद आणि कार्यशाळा झाल्यावर सहभागी झालेल्या गुंतवणूकदारांच्या प्रतीक्रिया त्यामुळे काम करण्यास हुरूप आला. हे करताना लक्षात आले कि महाराष्ट्रात आर्थिक शिक्षणाचे कार्य खूप मोठे आहे आणि आपल्याला काही मर्यादा आहेत. त्यानंतर "नवी अर्थक्रांती" च्या माध्यमातून अर्थविषयक लेख लिहायला सुरुवात केली. त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला. आणि त्या लेख मालिकेचे "स्मार्ट गुंतवणूकदार - एक पाऊल आर्थिक उन्नतीकडे" हे पुस्तक "नवी अर्थक्रांती" यांनी प्रकाशीत केले. तरीही संपूर्ण महाराष्ट्र जर अर्थ साक्षर करायचा असेल तर यासाठी कोणी एका दुकट्याने हे कार्य पार पाडता येणार नाही हे लक्षात आले.
आज आर्थिक साक्षरतेत काम करणारे खूप जण आहेत पण कुठेतरी याचे मोठे व्यासपीठ उभा रहावे आणि घराघरात आर्थिक साक्षरता पोहचविण्यासाठी "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" या उपक्रमाची कल्पना डोक्यात आली. गुंतवणुक क्षेत्रातील मान्यवरांचे लिखाण एकाच व्यासपिठावर महाराष्ट्रातील सर्व जनतेला उपलब्ध व्हावे या कल्पनेतून "मराठी पैसा" या संकल्पनेचा उगम झाला.
"मराठी पैसा" च्या माध्यमातून आम्ही आपणासमोर काही निवडक आणि माहितीपूर्ण लेख आणू जे तुमच्या आर्थिक जीवनाला एक नवी दिशा देतील.
ज्याप्रमाणे जगातील सर्वश्रेष्ठ राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी शस्त्र आणि शास्त्र याचा योग्य वापर करन साऱ्या परकीय आक्रमणांना जेरीस आणले. तसेच आज आर्थिक शास्त्र जर आपण योग्यरितीने आत्मसात केले तर भविष्यातील महाराष्ट्र आर्थिक रित्या समृद्ध असेल यात काहीच शंका नाही.
Last updated on Jan 31, 2025
Added New Menus
Added Quotes Category
Added Calculators
Updated Notification Module
Resolved Bugs & Improved Performance
Được tải lên bởi
Yan Lay
Yêu cầu Android
Android 4.4+
Danh mục
Báo cáo
Marathi Paisa
मराठी पैसा3.0 by Marathi Paisa
Jan 31, 2025